Political Drama:महुआ मोइत्रा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांना सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा दणका दिला आहे. सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याबद्दल त्यांच्यावर गु
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांना सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा दणका दिला आहे. सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांसमोर व्हर्च्युअल हजर राहण्याची मागणी करणाऱ्या मोइत्रा यांच्या अर्जावर न्यायालयाने कठोर टिप्पणी केली. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, राजकारणात आल्यानंतर अंड्यांच्या फेकीला घाबरता का? आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी तर गोळ्या झेलल्या होत्या, असे न्यायालयाने म्हटले. या कठोर शब्दांमुळे मोइत्रा यांच्या वकिलांनी याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता त्यांना १४ ऑगस्ट रोजी पोलिसांसमोर प्रत्यक्ष हजर राहून चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर भाजपच्या एका नेत्याने फेसबुकवर चिथावणीखोर पोस्ट शेअर केल्याबद्दल तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने याप्रकरणी मोइत्रा यांना १४ ऑगस्ट रोजी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. तसेच, या काळात त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आणि निदर्शकांकडून कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. या पार्श्वभूमीवर मोइत्रा यांनी सुरक्षेच्या कारणावर जोर देत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याची परवानगी मागितली होती.



















