Government's Plot to Arrest Me:मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी २९ ऑगस्टपासून आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी २९ ऑगस्टपासून आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे, ज्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती सरकारवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. जरांगे पाटील यांनी आरोप केला आहे की, सरकार जात वैधता प्रमाणपत्र रद्द करीत आहे. याबाबत बोलताना त्यांनी आज (८ ऑगस्ट) सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ‘मला अटक करण्याचा सरकारचा नवा डाव आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे की, त्यांना अटक करून दाखवावी.
मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, “मी काय चुकीचं बोलतोय? कुणबी प्रमाणपत्र रद्द करायला लावले जात आहेत, मग मी काय चुकीचं बोलतो?” त्यांनी एका बोडखे नावाच्या व्यक्तीच्या जात वैधता प्रमाणपत्राची पडताळणी झाल्याचे आणि त्याच्याच बहिणीच्या प्रमाणपत्राची पडताळणी रद्द करण्यात आल्याचे उदाहरण दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी आरोप केला आहे की, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून त्यांच्या मुळावर उठले आहेत. जरांगे पाटील यांनी सरकारला प्रश्न केला आहे की, “आमचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द का केले जात आहेत?” आणि याबाबत सरकारने स्पष्टता द्यावी, असेही त्यांनी सांगितले.





















