Controversy Over Quiz Question: केरळमध्ये सावरकरांच्या नावावरून वाद निर्माण

केरळमधील एका शाळेत आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषेतून राजकीय वाद निर्माण झाला आहे. या प्रश्नमंजुषेत विचारण्यात आलेल्या प्रश्नात ब्रिटिशांकडून कोणत्या स्वातंत्र्यसै
केरळमधील एका शाळेत आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषेतून राजकीय वाद निर्माण झाला आहे. या प्रश्नमंजुषेत विचारण्यात आलेल्या प्रश्नात ब्रिटिशांकडून कोणत्या स्वातंत्र्यसैनिकाला सर्वात कठोर शिक्षा देण्यात आली, असे विचारण्यात आले होते. या प्रश्नाचे उत्तर विनायक दामोदर सावरकर असे दिले गेले. ६ ऑगस्ट रोजी कासारगोड जिल्ह्यातील मंजेश्वरम आणि कुंबला उप-जिल्ह्यांमधील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी हा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या प्रश्नावरून विरोधकांनी आक्षेप घेतला आहे, कारण संघ परिवाराने स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतला नव्हता, असे त्यांचे म्हणणे आहे. शिक्षण मंत्री एन. शमसुद्दीन यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रश्नमंजुषा कोणत्या संस्थेने तयार केली, याचा शोध घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. शिक्षण संचालकांना जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मंत्र्यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, या प्रश्नमंजुषेत विचारलेले प्रश्न सोशल सायन्स क्लब किंवा सामान्य शिक्षण विभागाच्या अधिकृत उपक्रमांच्या यादीत नाहीत. प्रश्न ठरविण्यात या दोन्ही विभागांचा कोणताही सहभाग नव्हता. मंत्र्यांच्या कार्यालयाने आरोप केला आहे की, ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचा प्रश्न तयार करणाऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश शिक्षण संचालकांना देण्यात आले आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, सोशल सायन्स क्लबमधील काही शिक्षकांनी या प्रश्नावलीची रचना केली होती.





















