Adoption Process in Thane:ठाण्यात दत्तक प्रक्रियेच्या माध्यमातून सात प्रकरणे पूर्ण

ठाणे शहरात दत्तक प्रक्रियेसाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या ‘कारा’ (cara – central adoption resource authority) या ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून सात दत्तक प्रकर
ठाणे शहरात दत्तक प्रक्रियेसाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या ‘कारा’ (CARA – Central Adoption Resource Authority) या ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून सात दत्तक प्रकरणे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहेत. या प्रकरणांमध्ये चार देशांतर्गत, एक आंतरदेशीय आणि दोन नातेवाईकांअंतर्गत दत्तक प्रक्रिया समाविष्ट आहे. दत्तक प्रक्रियेचा उद्देश केवळ बालकाला कुटुंबात समाविष्ट करणे नसून, त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि भविष्यातील संरक्षणासाठी कायदेशीर हक्कांची पूर्तता करणे आहे. त्यामुळे, दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांनी अधिकृत ‘कारा’ पोर्टलचा वापर करूनच दत्तक प्रक्रिया पार करावी, असे आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
दत्तक प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. या प्रक्रियेत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण समिती आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. दत्तक प्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी पालकांनी अधिकृत नोंदणी करून पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे. यामुळे दत्तक प्रक्रियेत पारदर्शकता राहते आणि बालकाच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर प्रक्रियांचे पालन करता येते.





















