Ravi Kishan's Daughter Joins Army:रवी किशन यांच्या लेकीने सैन्यात प्रवेश केला

अभिनेता आणि खासदार रवी किशन सध्या त्यांच्या विनोदी रील्स आणि मीम्समुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. जगभरात त्यांच्या मिम्सवर विविध प्रकारचे कंटेट तयार केले जात आह
अभिनेता आणि खासदार रवी किशन सध्या त्यांच्या विनोदी रील्स आणि मीम्समुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. जगभरात त्यांच्या मिम्सवर विविध प्रकारचे कंटेट तयार केले जात आहे. भारतात अनेक अभिनेते आणि नेत्यांच्या मुलांनी त्यांच्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच क्षेत्रात प्रवेश केला आहे. परंतु रवी किशन यांची मुलगी इशिता शुक्ला या संदर्भात एक अपवाद ठरते. तिने मनोरंजन क्षेत्रात किंवा राजकारणात प्रवेश न करता देशाच्या संरक्षण क्षेत्राची निवड केली आहे. त्यामुळे इशिताच्या या निर्णयामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
इशिताने चित्रपटसृष्टीच्या ग्लॅमरला नाकारत थेट भारतीय सैन्यदलाची वाट निवडली आहे. ‘अग्निपथ’ योजनेच्या अंतर्गत ती भारतीय सैन्यात सामील झाली आहे. अभिनेते रवी किशन यांची मुलगी असल्यामुळे बॉलिवूड किंवा अभिनय क्षेत्रात पदार्पण करणे इशितासाठी सहज शक्य होते. मात्र, लहानपणापासूनच कडक शिस्त, शारीरिक मेहनत आणि देशसेवेची आवड असलेल्या इशिताने ग्लॅमरस विश्वापेक्षा लष्कराचा गणवेश निवडला आहे. इशिता दिल्ली डायरेक्टरेटच्या ‘७ गर्ल्स बटालियन’ची एनसीसी कॅडेट होती. जानेवारी २०२३ मध्ये कर्तव्य पथावर पार पडलेल्या प्रजासत्ताक दिन संचलनासाठी देशभरातील ६५९ महिला कॅडेट्समधून ज्या १४८ जणांची निवड झाली होती, त्यात इशिताचाही समावेश होता. यासाठी ती तीन वर्षांपासून कठोर सराव करत होती.

















