Rainy Days and Wet Notes:पावसाळ्यात भिजलेल्या नोटा वाचवण्यासाठी घरगुती उपाय

पावसाळा म्हणजेच निसर्गाची एक वेगळीच रंगत. या काळात अचानक येणाऱ्या पावसामुळे अनेकदा आपल्या पर्समध्ये किंवा खिशात ठेवलेल्या नोटा भिजून जातात. या भिजलेल्या नोटा पू
पावसाळा म्हणजेच निसर्गाची एक वेगळीच रंगत. या काळात अचानक येणाऱ्या पावसामुळे अनेकदा आपल्या पर्समध्ये किंवा खिशात ठेवलेल्या नोटा भिजून जातात. या भिजलेल्या नोटा पूर्णपणे खराब झाल्या नसल्यास, त्यांना योग्य पद्धतीने वाळवणे महत्त्वाचे आहे. भारतीय घरांमध्ये यासाठी काही पारंपरिक उपाय वर्षानुवर्षे वापरले जात आहेत. या उपायांमुळे ओल्या नोटा फाटण्यापासून वाचतात आणि त्यांचा पुनर्वापर करणे शक्य होते. त्यामुळे, पावसात भिजलेल्या नोटा वाचवण्यासाठी काही प्रभावी उपाय पाहूया.
भिजलेल्या नोटा वाचवण्यासाठी सर्वप्रथम त्या एकमेकींपासून अलग करणे आवश्यक आहे. जर नोटा चिकटलेल्या असतील तर त्यांना जोरात ओढू नका. प्रत्येक नोटा स्वच्छ आणि कोरड्या कापडावर किंवा टॉवेलवर सपाट ठेवावी. त्यावर दुसरे कोरडे कापड ठेवून हलकेच दाबा, ज्यामुळे अतिरिक्त ओलावा शोषला जाईल. नोटा सावलीत आणि हवेशीर ठिकाणी ठेवल्यास त्या नैसर्गिकरीत्या सुकतात. दरम्यान, नोटांची बाजू बदलणे आवश्यक आहे, ज्यामुळे दोन्ही बाजू व्यवस्थित कोरड्या होऊ शकतात. याशिवाय, पंख्याच्या साहाय्यानेही नोटा वाळवता येतात. स्वच्छ कागदावर किंवा कापडावर नोटा एका थरात ठेवून पंखा चालू ठेवल्यास, हवेशीर वातावरणामुळे ओलावा कमी होतो. नोटा एकत्र चिकटून राहू नयेत म्हणून त्यांना अधूनमधून हलके हलवावे लागेल.



















