Flower Rangoli Tips:फुलांच्या पाकळ्या ताज्या ठेवण्यासाठी खास ट्रिक

श्रावण महिन्यात सणांची गडबड सुरू होत आहे आणि त्यात मंगळागौर, राखीपौर्णिमा यांसारखे महत्त्वाचे सण येत आहेत. या सणांच्या पार्श्वभूमीवर, दारासमोर रांगोळी काढणे एक
श्रावण महिन्यात सणांची गडबड सुरू होत आहे आणि त्यात मंगळागौर, राखीपौर्णिमा यांसारखे महत्त्वाचे सण येत आहेत. या सणांच्या पार्श्वभूमीवर, दारासमोर रांगोळी काढणे एक अनिवार्य घटक बनले आहे. सध्या रंगांची रांगोळी काढण्याऐवजी अनेकजण फुलांच्या पाकळ्यांची रांगोळी काढण्यास प्राधान्य देत आहेत. परंतु, या रांगोळीत एक समस्या येते, ती म्हणजे फुलांच्या पाकळ्या लवकरच कोमेजून जातात. या समस्येवर उपाय सुचवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडिओत एक आर्टिस्टने सांगितले आहे की, फुलांच्या पाकळ्या ताज्या ठेवण्यासाठी काही खास ट्रिक्स आहेत.
रांगोळीत वापरण्यासाठी फुलांच्या पाकळ्या अधिक काळ ताज्या राहण्यासाठी काही उपाय आहेत. विशेषतः, जेव्हा आपण मोठ्या कार्यक्रमासाठी रांगोळी काढण्याचा विचार करतो, तेव्हा आपण आदल्या दिवशीच फुलं आणून ठेवतो. परंतु, बाजारातून आणलेली फुलं नेहमी ताज्या असतातच असे नाही. त्यामुळे, फुलं आणल्यानंतर, एक मोठा टब पाण्याने भरून त्या पाण्यात फुलं अर्धा तास बुडवून ठेवणे आवश्यक आहे. हा उपाय विशेषतः झेंडू आणि गुलाबाच्या फुलांसाठी उपयुक्त आहे. पाण्यातून बाहेर काढल्यानंतर, फुलांवर हलका दाब देऊन त्यांच्यातील पाणी निथळून टाकावे. यानंतर, दुसऱ्या टबमध्ये ठेवून २ ते ३ तास झाकून ठेवणे आवश्यक आहे.



















