John Abraham's Special Connection with Rohit Sharma:रोहित शर्मा-जॉन अब्राहममध्ये आहे खास कनेक्शन

बॉलीवूड आणि क्रिकेट यांच्यातील संबंध नेहमीच चर्चेत राहतात. अनेक क्रिकेटपटू आणि चित्रपट कलाकार यांच्यातील मैत्री आणि प्रेमसंबंधामुळे या दोन्ही क्षेत्रांमध्ये एक
बॉलीवूड आणि क्रिकेट यांच्यातील संबंध नेहमीच चर्चेत राहतात. अनेक क्रिकेटपटू आणि चित्रपट कलाकार यांच्यातील मैत्री आणि प्रेमसंबंधामुळे या दोन्ही क्षेत्रांमध्ये एक विशेष कनेक्शन निर्माण झाले आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा, हरभजन सिंग आणि गीता बसरा यांसारख्या जोड्या चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. चित्रपटांच्या प्रमोशनपासून ते आयपीएल सामन्यांपर्यंत, दोन्ही क्षेत्रांतील व्यक्ती एकमेकांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसतात. यामुळे क्रिकेट आणि चित्रपट यांच्यातील संबंध अधिक दृढ होत आहेत. सध्या जॉन अब्राहमचा एक व्हिडिओ चर्चेत आहे, ज्यामध्ये त्याने रोहित शर्मा याच्याबद्दल एक विशेष गोष्ट सांगितली आहे.
जॉन अब्राहमने एका व्हिडिओमध्ये खुलासा केला आहे की, रोहित शर्मा याचे बालपणातील क्रिकेट कोच दिनेश लाड हे त्याचेही कोच होते. जॉन अब्राहमने सांगितले की, रोहितच्या कोचिंगमध्ये त्यानेही प्रशिक्षण घेतले आहे. यामुळे त्यांच्या दोन्हीच्या क्रीडा कारकिर्दीमध्ये एक विशेष कनेक्शन आहे. जॉन अब्राहमने युरोपियन टी-२० प्रीमियर लीगच्या (ETPL) पहिल्या हंगामाच्या जर्सी लॉन्च कार्यक्रमात भाग घेतला होता, जिथे त्याने या कनेक्शनवर प्रकाश टाकला. जॉन अब्राहम या संघाचा सह-मालक आहे आणि त्याच्यासोबत जॉन्टी रोड्स, फाफ डू प्लेसिस आणि हेन्रिक क्लासेन यांच्यासारखे खेळाडूही आहेत.





















