TCS Case: एमआयएम नगरसेवक मतीन पटेलला न्यायालयीन कोठडी

नाशिकमध्ये टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय देणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवक मतीन पटेल याला नाशिक पोल
नाशिकमध्ये टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय देणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवक मतीन पटेल याला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात मतीन पटेल याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. टीसीएस प्रकरणात मुंबई नाका आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल आहेत, ज्यामध्ये निदा खान प्रमुख संशयित आहे. तिला पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वी मतीन पटेलच्या मदतीने छत्रपती संभाजी नगरमध्ये आश्रय मिळाला होता. या प्रकरणात विशेष तपास पथकाने हनिफ खान आणि पटेल यांची सुमारे सात ते आठ तास चौकशी केली, ज्यामध्ये त्यांच्या भ्रमणध्वनी जप्त करण्यात आले. एसआयटीच्या चौकशीत मतीन पटेलने निदाला आश्रय दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
मतीन पटेल याला न्यायालयाने समन्स बजावले होते, परंतु तो ३१ जुलै रोजी न्यायालयात उपस्थित राहिला नाही. त्यामुळे त्याच्या विरोधात अजामीनपात्र आदेश काढण्यात आला. या आदेशाची अंमलबजावणी करत नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला छत्रपती संभाजी नगरातून ताब्यात घेतले. न्यायालयात पटेलच्या वतीने ॲड. प्रतीक ताजनपुरे यांनी युक्तीवाद केला, परंतु न्यायालयाने दोन्ही बाजूंचा विचार करून पटेलला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. टीसीएस प्रकरणातील अन्य आठ आरोपींपैकी पाच जणांना जामीन मंजूर झाला आहे, तर दानिश शेखसह तिघांचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे.



















