Recovery of Stolen Goods: गुन्ह्यातील तब्बल ४ कोटींचा मुद्देमाल परत; विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून सांगली पोलिसांचे कौतुक

सांगली जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील मुद्देमालाची मोठी पुनर्प्राप्ती करण्यात आली आहे. एकूण ४ कोटी २ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल,
सांगली जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील मुद्देमालाची मोठी पुनर्प्राप्ती करण्यात आली आहे. एकूण ४ कोटी २ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल, ज्यामध्ये ३ कोटी ५ लाखांचे सोने, चांदी, मोबाईल आणि ऑनलाईन फसवणुकीतील ९७ लाख ३२ हजार रुपये समाविष्ट आहेत, हा मुद्देमाल संबंधित व्यक्तींना परत करण्यात आला. या संदर्भात विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी विश्रामबाग येथील खरे क्लब हाऊसमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले की, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी २४ तास कार्यरत असलेल्या पोलिस दलावर जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी सांगली जिल्हा पोलिसांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गुन्ह्यांच्या तपासात जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचे शिस्तबद्ध, पारदर्शक आणि नियमानुसार हस्तांतरण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, ज्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच नागरिकांच्या विश्वासाला बळ मिळाले आहे. पोलिस दलाने गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि घडलेल्या गुन्ह्यांचा वेळेत छडा लावण्यासाठी कर्तव्यदक्षता दाखवली आहे. विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत ज्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखणे अधिक प्रभावी झाले आहे.
पोलिस अधीक्षक दोशी यांनी सांगितले की, गुन्ह्यांना प्रतिबंध करणे आणि गुन्हे अन्वेषण हे पोलिसांचे प्रमुख कार्य आहे. गुन्ह्यातील संपत्ती संबंधित व्यक्तींना परत केली गेली तर पीडितांना खरे न्याय मिळतो. दागिने हे केवळ ऐवज नसून, त्यात संबंधितांची भावनिक गुंतवणूक असते. मूर्ती आणि दागिन्यांचे सांस्कृतिक महत्त्व देखील असते. त्यामुळे हा मुद्देमाल परत करताना संबंधितांचे भावनिक मूल्य परत करण्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी सांगितले की, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, अचूक अभिलेख आणि नियमित पडताळणी यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील मुद्देमाल व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पोलिस दल सतत प्रयत्नशील आहे. या कार्यक्रमात सुनील गुरव यांनी सूत्रसंचालन केले, तर उपअधीक्षक अजय कोकाटे यांनी आभार मानले.





















