Shocking Family Dispute: पत्नीने पतीला जिवंत पुरण्याचा कट रचला

बारामती: बारामती शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, ज्यामध्ये एका पत्नीने आपल्या पतीला जिवंत पुरण्याचा कट रचला. या घटनेत पतीला औषध देऊन बेशुद्ध करून, घराती
बारामती: बारामती शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, ज्यामध्ये एका पत्नीने आपल्या पतीला जिवंत पुरण्याचा कट रचला. या घटनेत पतीला औषध देऊन बेशुद्ध करून, घरातील हॉलच्या गॅलरीत कट्टा बांधून त्याला त्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे स्थानिक पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यामुळे पतीचा जीव वाचला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश कान्होबा जगताप (वय ७१) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पत्नी शर्मिला प्रवीण जगताप (वय ३८) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३० जुलैच्या रात्री साडेअकरा ते १ ऑगस्टच्या सकाळी ११.३० दरम्यान जामदार रोडवरील इंद्रप्रस्थ सोसायटीतील त्यांच्या राहत्या फ्लॅटमध्ये घडली.
फिर्यादी प्रकाश जगताप यांचा ४१ वर्षीय मुलगा प्रवीण आणि शर्मिला यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होते. या वादामुळे पत्नीने पतीला जीवे ठार मारण्याचा कट रचला. यासाठी तिने हॉलच्या गॅलरीत चौकोनी कट्टा बांधला आणि पतीला अज्ञात औषध देऊन बेशुद्ध केले. बेशुद्धावस्थेत असलेल्या प्रवीण यांना त्या कट्ट्यात झोपवून, कट्ट्याच्या कडाप्पा फरशीने बंद करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती अज्ञात व्यक्तीने डायल ११२ द्वारे पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कट्ट्यातून बेशुद्धावस्थेत असलेल्या प्रवीण यांना बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाखल केले.



















