Fake Ghee Scandal: बनावट तुपाचा मोठा पर्दाफाश, आरोग्यासाठी घातक

छाप्यादरम्यान अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तुपाचे नमुने घेऊन ते तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवले. रिपोर्ट आल्यानंतर हे तूप गुणवत्तेच्या मानकांवर पूर्णपणे अपयशी ठरले अस
छाप्यादरम्यान अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तुपाचे नमुने घेऊन ते तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवले. रिपोर्ट आल्यानंतर हे तूप गुणवत्तेच्या मानकांवर पूर्णपणे अपयशी ठरले असून मानवी वापरासाठी अत्यंत असुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं. तपासात तुपातील मॉईश्चरचं प्रमाण ठरवून दिलेल्या मानकांपेक्षा खूपच कमी आढळलं. फ्री फॅटी ॲसिडचे प्रमाणही निश्चित पातळीपेक्षा कमी होतं. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे नमुन्यांमध्ये हळद आणि 'बीटा-सिटोस्टेरॉल'सारखे घटक आढळले, जे शुद्ध साजूक तुपात अजिबात नसावेत. याच आधारे हे तूप भेसळयुक्त आणि जीवघेणं घोषित करण्यात आलं. पोलीसांनी घटनास्थळावरून ३४.०५ किलोग्रॅम बनावट तूप, कच्चा माल, यंत्रसामग्री आणि मोबाईलसह ४३ हजार ५३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी डेअरी चालक राजेश कुमार जगदीशभाई पटेल (वय ४२), रा. वेड रोड याला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध चौक बाजार पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.



















