Accident on Mumbai Pune Expressway: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील भयंकर अपघात

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकच्या बोगद्यात शुक्रवारी पहाटे एक गंभीर अपघात झाला. या अपघातात एक भरधाव एसयूव्ही कारने मागून मिनी ट्रकला जोरदार धडक दिली. य
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकच्या बोगद्यात शुक्रवारी पहाटे एक गंभीर अपघात झाला. या अपघातात एक भरधाव एसयूव्ही कारने मागून मिनी ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत पिंपरी-चिंचवडमधील युवा काँग्रेस कार्यकर्ता तुषार भूमकर यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. महामार्ग सुरक्षा पथकाचे अधीक्षक शिवाजी पवार यांनी सांगितले की, हा अपघात पहाटे १:२० वाजता घडला. कारचा वेग इतका होता की चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ती समोरच्या मिनी ट्रकला धडकली. धडक इतकी भयंकर होती की कारचा चक्काचूर झाला. पोलिसांनी तत्काळ कार चालकाला अटक केली आहे.
या अपघातानंतर शिवसेना (ठाकरे गट) आमदार मिलिंद नार्वेकर यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, खंडाळा घाटात केमिकल टँकरच्या अपघातानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे अवजड वाहनांना मिसिंग लिंकवर प्रवेश बंदी घालण्याची मागणी केली होती, जी मान्य करण्यात आली होती. तरीही, हा टेम्पो कसा बोगद्यात आला, हे आश्चर्यकारक आहे. नार्वेकर यांनी स्पष्ट केले की, या अपघातासाठी केवळ टेम्पो चालकच नाही, तर त्याला तिथे प्रवेश देणारा पोलीस कर्मचारीही तितकाच दोषी आहे.



















