Redmi Note 17 5G: महागड्या स्मार्टफोनला टक्कर! रेडमी नोट १७ 5G भारतात लॉन्च, मिड-रेंजमध्ये अफलातून फीचर्स

रेडमीने आपल्या नवीनतम स्मार्टफोन, रेडमी नोट १७ 5g, भारतात लाँच केला आहे. हा फोन नोट १७ सीरिजमधील पहिला स्मार्टफोन आहे आणि चीनमध्ये लाँच झाल्यानंतर काही आठवड्यां
रेडमीने आपल्या नवीनतम स्मार्टफोन, रेडमी नोट १७ 5G, भारतात लाँच केला आहे. हा फोन नोट १७ सीरिजमधील पहिला स्मार्टफोन आहे आणि चीनमध्ये लाँच झाल्यानंतर काही आठवड्यांनी भारतीय बाजारात दाखल झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना उत्कृष्ट डिस्प्ले, प्रभावी कॅमेरा आणि शक्तिशाली बॅटरीसह HyperOS 3 सारखी अद्वितीय फीचर्स उपलब्ध आहेत. भारतात हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत २७,९९९ रुपये आहे, तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ३०,९९९ रुपये आहे. कंपनीने एसबीआय, अॅक्सिस बँक आणि कोटक बँकेच्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी ३,००० रुपयांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंटची ऑफर दिली आहे. हा फोन १२ ऑगस्टपासून अॅमेझॉन आणि शाओमी इंडियाच्या ऑनलाइन स्टोअरवर उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना अर्टिक ब्लू, डार्क नाइट आणि स्टार लाईट पर्पल या तीन आकर्षक रंगांमध्ये हा फोन खरेदी करता येईल.
रेडमी नोट १७ 5G मध्ये ६.९ इंचाचा Full-HD+ AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन १०८० x २३९६ पिक्सेल आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट १२०Hz आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना एक स्मूथ अनुभव मिळतो. यामध्ये १०० टक्के DCI-P3 कलर गॅमट, १८०० निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस, २४०Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 960Hz PWM DC डिमिंगची सुविधा आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी Corning Gorilla Glass 7i वापरण्यात आले आहे, ज्यामुळे फोन अधिक टिकाऊ बनतो. फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आहे, जो f/1.8 अपर्चर आणि 2x डिजिटल झूम सपोर्टसह येतो. सेल्फी कॅमेरासाठी ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे, जो f/2.0 अपर्चरसह येतो आणि 1080p/30fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंगची क्षमता आहे.



















