Daily Production of Rail Neer:रेल नीरच्या उत्पादनाची माहिती

भारतीय रेल्वेच्या रेल नीर प्लांट्सद्वारे दररोज लाखो प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाते. देशभरात अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना पाण्याची सोय करण्य
भारतीय रेल्वेच्या रेल नीर प्लांट्सद्वारे दररोज लाखो प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाते. देशभरात अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. रेल्वे प्रवास करताना प्रवाशांना चांगले पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी रेल नीरची स्थापना करण्यात आली. रेल नीरचे पाणी भारतीय रेल्वेच्या केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या प्लांटमध्ये तयार केले जाते. सध्या भारतात एकूण १९ रेल नीर प्लांट कार्यरत आहेत, ज्यामध्ये दररोज १३ लाख लीटर पाण्याचे बाटले तयार केले जातात. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत याबाबत माहिती दिली आहे. या प्लांट्समध्ये स्वयंचलित संयंत्रे बसवण्यात आलेली आहेत, ज्यामुळे पाण्याची प्रक्रिया अधिक प्रभावीपणे केली जाते. पाण्याचे फिल्ट्रेशन, ऑटो-सॉफ्टनिंग युनिट्स आणि रिव्हर्स ऑस्मोसिस प्रणालीद्वारे पाण्याची शुद्धता सुनिश्चित केली जाते. यानंतर अल्ट्राव्हायोलेट प्रक्रिया आणि ओझोनेशन करून पाण्याची गुणवत्ता वाढवली जाते. प्रत्येक प्लांटची उत्पादन क्षमता दररोज १ लाख बाटल्यांची आहे, ज्यामुळे प्रवाशांना आवश्यक पाण्याचा पुरवठा करण्यात येतो.
रेल नीरचे प्लांट देशभरातील विविध शहरांमध्ये कार्यरत आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक तीन प्लांट आहेत, तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी दोन प्लांट आहेत. उत्तर भारतात नांगलोई (दिल्ली), हापूर आणि अमेठी (उत्तर प्रदेश), उना (हिमाचल प्रदेश) आणि कोटा (राजस्थान) येथे पाच प्लांट आहेत. पूर्व आणि ईशान्य भारतात दानापूर (बिहार), संक्रैल (पश्चिम बंगाल), जागीरोड (आसाम) आणि भुवनेश्वर (ओडिशा) येथे चार प्लांट आहेत. पश्चिम आणि मध्य भारतात अंबरनाथ, नागपूर आणि भुसावळ (महाराष्ट्र), मनेरी आणि मंडीदीप (मध्य प्रदेश) आणि सानंद (गुजरात) येथे सहा प्लांट आहेत. दक्षिण भारतात पालूर (तामिळनाडू), बिलासपूर (छत्तीसगड), सिंहाद्री आणि विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथे चार प्लांट आहेत. हे सर्व प्लांट भारतीय रेल्वेच्या प्रवाशांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहेत.
















