Teeth Whitening Home Remedy: दात पिवळे पडणे आणि हिरड्यांचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय

दात पिवळे पडणे, हिरड्यांतून रक्त येणे, तोंडाला दुर्गंधी येणे किंवा दातात किड लागणे या समस्या अनेकांना त्रास देतात. अशा वेळी काही लोक महागडे उपचार निवडतात, तर का
दात पिवळे पडणे, हिरड्यांतून रक्त येणे, तोंडाला दुर्गंधी येणे किंवा दातात किड लागणे या समस्या अनेकांना त्रास देतात. अशा वेळी काही लोक महागडे उपचार निवडतात, तर काहीजण घरगुती उपायांवर विश्वास ठेवतात. सध्या सोशल मीडियावर स्वयंपाकघरातील काही सहज उपलब्ध वस्तूंनी दात स्वच्छ आणि मजबूत होतात, असा दावा करणारा एक उपाय मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या उपायामुळे दात पांढरे करण्यास मदत होऊ शकते, तसेच हिरड्यांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकते. या उपायासाठी चार सहज उपलब्ध वस्तू वापरण्याचा सल्ला दिला जातो. मेथी दाणे, आले, मोहरीचे तेल आणि तुरटी पावडर यांचा वापर करून एक पेस्ट तयार केली जाते. या पेस्टचा उपयोग दातांवर केल्यास दात स्वच्छ होण्यास मदत होते. मात्र, याबाबत सर्वांसाठी समान परिणाम होतील असे कोणतेही ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे या उपायांचा उपयोग करताना काळजी घेणे आवश्यक आहे.
या घरगुती उपायासाठी मेथी दाणे, आले, मोहरीचे तेल आणि तुरटी पावडर यांचा वापर केला जातो. या सर्व वस्तू एकत्र करून जाडसर वाटून त्याची पेस्ट तयार केली जाते. तयार झालेली पेस्ट ब्रशवर थोड्या प्रमाणात घेऊन नेहमीच्या टूथपेस्टने ब्रश करण्यापूर्वी साधारण एक ते दोन मिनिटे हलक्या हाताने दातांवर फिरवण्याचा सल्ला दिला जातो. दातांवर तंबाखू, गुटखा किंवा पानाचे हट्टी डाग असतील तर काही दिवस सकाळ-संध्याकाळ हा उपाय केल्यास फरक जाणवू शकतो, असा दावा केला जातो. मेथीमध्ये दाह कमी करण्यास मदत करणारे काही घटक असतात, त्यामुळे हिरड्यांच्या आरोग्यासाठी ती काही प्रमाणात उपयुक्त ठरू शकते. आलेमध्ये जंतुनाशक आणि दाह कमी करणारे गुणधर्म असल्याचे काही संशोधनातून दिसून आले आहे, त्यामुळे दातदुखी किंवा हिरड्यांतील सूज कमी करण्यास मदत होऊ शकते.



















