Strict Action Against Drug Quality Violations: पुण्यातील इंड्युकेअर फार्मचा उत्पादन परवाना कायमचा रद्द

पुणे: आयुर्वेदिक औषधांच्या उत्पादनात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इंड्युकेअर फार्मा प्रा. लि. या कंपनीच्या उत्पादन परवाना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कायमचा रद्द
पुणे: आयुर्वेदिक औषधांच्या उत्पादनात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इंड्युकेअर फार्मा प्रा. लि. या कंपनीच्या उत्पादन परवाना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कायमचा रद्द केला आहे. जेजुरी एमआयडीसी येथील या कंपनीने तयार केलेल्या सहा औषधांची गुणवत्ता शासकीय विश्लेषकांनी निकृष्ट असल्याचे घोषित केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्याने एफडीएने ही कठोर कारवाई केली आहे. कंपनीच्या औषधांमध्ये बुरशी, सूक्ष्मजंतू आणि इतर अशुद्ध पदार्थ आढळल्याने त्यांची गुणवत्ता धोक्यात आली होती. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, याची गंभीर दखल घेतली गेली आहे.
एफडीएने कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेची दोन वेळा तपासणी केली असता औषध व प्रसाधने कायद्याचे तसेच गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसचे नियम गंभीरपणे उल्लंघन केले असल्याचे आढळले. औषध निर्मितीच्या पुराव्यांचा अभाव, बॅच मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड अपूर्ण असणे, कच्च्या मालाच्या गुणवत्तेची चाचणी न करणे, प्रयोगशाळेतील आवश्यक सुविधा नसणे, आणि उत्पादन विभागात अस्वच्छता यासारख्या अनेक गंभीर बाबींचा समावेश होता. याशिवाय, तापमान व आर्द्रता नियंत्रणाची व्यवस्था नसल्याने औषधांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.



















