Health Benefits of Turmeric Milk:रात्री झोपण्याआधी हळदीचं दूध का प्यावं? डॉक्टर सांगतात फक्त १२ दिवसांत दिसतील 'हे' बदल

हळदीचं दूध, ज्याला आयुर्वेदात गोल्डन मिल्क म्हणून ओळखलं जातं, हे अनेक वर्षांपासून लोकांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने इम्युनि
हळदीचं दूध, ज्याला आयुर्वेदात गोल्डन मिल्क म्हणून ओळखलं जातं, हे अनेक वर्षांपासून लोकांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने इम्युनिटी वाढवण्यास मदत होते. साओल हॉर्ट सेंटरचे संस्थापक, डॉक्टर बिमल छाजेर यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी हळदीचं दूध पिण्याचे फायदे स्पष्ट केले आहेत. हळदीचं दूध पिण्याची योग्य पद्धत आणि कोणत्या व्यक्तींनी याचे सेवन टाळावे, हे समजून घेणे आवश्यक आहे. हळदीचं दूध पिण्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात, ज्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
हळदीच्या दुधात असलेल्या एंटी इंफ्लामेटरी गुणधर्मांमुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते. सूज कमी करणे हृदयासाठी अत्यंत फायदेशीर ठरते, कारण यामुळे बॅड कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. हळदीच्या दुधामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, त्वचा चांगली राहते आणि पचनक्रिया सुधारते. हळदीतील करक्यूमिन ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतो आणि शरीरातील सेल्सच्या नुकसानीपासून संरक्षण करतो. हळदीचं दूध अधिक पौष्टिक बनवण्यासाठी त्यात काळी मिरी, दालचिनी आणि आलं घालण्याची शिफारस केली जाते. यामुळे त्यातील पोषणतत्त्वांची मात्रा वाढते. हळदीचं दूध पिण्यासाठी स्किमिड मिल्क किंवा प्लांटबेस्ट मिल्क वापरता येते, मात्र हळद दोन चमच्यांपेक्षा जास्त घेणे टाळावे. हार्टच्या रुग्णांनी लो फॅट दूध वापरणे अधिक योग्य ठरते. संतुलित आहार आणि नियमित व्यायामासोबत हळदीचं दूध पिण्याचे फायदे अधिक प्रभावीपणे अनुभवता येतात.





















