Star-studded Cast in Dashami: 'दशमी' सिनेमात दिग्गज कलाकारांची मांदियाळी!

भारतीय संस्कृतीत विजयादशमी हा सण केवळ एक उत्सव नाही, तर अन्यायावर विजय मिळवण्याचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट शक्तींवर स्त्रीशक्तीच्या विजयाचा संदेश देणारा एक म
भारतीय संस्कृतीत विजयादशमी हा सण केवळ एक उत्सव नाही, तर अन्यायावर विजय मिळवण्याचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट शक्तींवर स्त्रीशक्तीच्या विजयाचा संदेश देणारा एक महत्वपूर्ण दिवस आहे. भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून धर्माची स्थापना केली, तर देवी दुर्गेने महिषासुराचा संहार करून संपूर्ण सृष्टीला शक्ती, धैर्य आणि विजयाचा एक नवीन अर्थ दिला. याच विजयाच्या आणि शक्तीच्या विचारांना समर्पित असलेला ‘दशमी’ हा मराठी चित्रपट ऑक्टोबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केले आहे.
‘दशमी’ चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचे अनावरण नुकतेच करण्यात आले आहे. या चित्रपटात विजय, शक्ती आणि संघर्षाची झलक पाहायला मिळते. प्रत्येक संघर्षातून उभा राहणारा विजय म्हणजेच खरी ‘दशमी’ हा विचार प्रभावीपणे मांडणाऱ्या या चित्रपटात महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, विजय निकम, गौरी इंगवले, प्रसन्न केतकर, देवेंद्र गायकवाड, शाम माशाळकर, राज कुंदन आणि दाक्षिणात्य स्टार अभिनेते रवि प्रकाश यांसारखे नामवंत कलाकार झळकणार आहेत. या चित्रपटात प्रत्येक पात्राची कथा आणि संघर्ष प्रेक्षकांना भावनिक पातळीवर जोडणारी असेल.
दिग्दर्शक योगेश भोसले याबद्दल सांगताना म्हणाले, “‘दशमी’ हा विचार प्रत्येक मुलीला आणि कुटुंबाला आत्मविश्वास आणि बळ देतो. हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नाही, तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील अन्यायाविरुद्ध उभं राहण्याच्या धैर्याचा आणि सत्याच्या विजयाचा प्रवास आहे. ‘दशमी’ हा सिनेमा प्रेक्षकांना विचार करायला लावणारा आणि मनात दीर्घकाळ घर करणारा असेल.” या चित्रपटाचे लेखन आणि संगीत सुरेश पंडित यांनी केले आहे. ‘दशमी’ हा सस्पेन्स-क्राईम थ्रिलरच्या श्रेणीत एक नवा मापदंड स्थापित करणारा चित्रपट आहे, जो प्रत्येक चित्रपटप्रेमीने मोठ्या पडद्यावर अनुभवावा असा अविस्मरणीय अनुभव देईल.




















