Nana Patekar's Incident:नाना पाटेकरांबद्दल अभिनेत्री मधूचा अनुभव

नाना पाटेकर यांचे नाव ऐकल्यावर अनेकांना त्यांचे विविध किस्से आठवतात. त्यांच्या सहकलाकारांनी त्यांच्याबरोबर काम करताना अनुभवलेल्या गोष्टी सांगितल्या आहेत. अभिनेत
नाना पाटेकर यांचे नाव ऐकल्यावर अनेकांना त्यांचे विविध किस्से आठवतात. त्यांच्या सहकलाकारांनी त्यांच्याबरोबर काम करताना अनुभवलेल्या गोष्टी सांगितल्या आहेत. अभिनेत्री मधूने एकदा एका मुलाखतीत नाना पाटेकरांबरोबरच्या कामाच्या अनुभवाबद्दल सांगितले होते. यशवंत या चित्रपटात नाना आणि मधू हे प्रमुख भूमिकेत होते. मधूने एका मुलाखतीत नाना पाटेकरांबरोबरच्या अनुभवाबद्दल सांगितले. तिने हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “एक सीन होता, ज्यामध्ये मला रडायचे होते. त्यामुळे मी ग्लिसरीन घेण्यासाठी गेले, पण नानांनी मला ते वापरू दिलं नाही. त्यांनी मला सांगितले की, तुझ्या मनात या भावना जाग्या कर, त्यामुळे डोळ्यातून आपोआप अश्रू येतील. पण मला ते जमत नव्हतं, आणि अचानक त्यांनी मला कानाखाली मारले. त्यांनी इतक्या जोरात मारले की माझ्या डोळ्यात अश्रू आले.” मधूने यशवंत सिनेमातील त्या सीनच्या शूटिंगचा किस्सा सांगितला.
मधू पुढे म्हणाली, “त्यांनी अचानक मला कानाखाली मारल्यामुळे मला खूप राग आला होता. कारण आम्ही त्या सीनसाठी सराव केला होता, आणि त्यावेळी त्यांनी असे काहीच केले नाही. त्यामुळे मला धक्का बसला. मला पटकन राग येतो आणि त्यामुळे मीही त्यांना कानाखाली मारले.” या घटनेने त्या भावनिक सीनला खूप मदत झाली, असे तिने सांगितले. “यशवंत सिनेमातील तो सीन खूप महत्त्वाचा होता. दिग्दर्शक अनिल मट्टू यांनी त्या सीनच्या शूटिंगसाठी संपूर्ण दिवस राखून ठेवला होता. पण नानांनी कानाखाली मारल्यामुळे मी भावूक झाले आणि त्या सीनचे शूटिंग अर्ध्या तासात झाले. नाना पाटेकरांबरोबर काम करताना मी खऱ्या अर्थाने मेथड अॅक्टर झाले.”





















