Video: अफ्रिकेत पोहचली छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा! युगांडातील चिमुकल्याने शाळेत केलेलं भाषण ऐकाच!

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक मानले जातात. त्यांच्या शौर्य, पराक्रम आणि आदर्श शासनाचे गुण आजही लोकांना प्रे
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक मानले जातात. त्यांच्या शौर्य, पराक्रम आणि आदर्श शासनाचे गुण आजही लोकांना प्रेरणा देत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये युगांडातील एका शाळेतील विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाषण केले आहे. हा व्हिडीओ पाहून महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक गर्वाने भरून जात आहे. युगांडाच्या त्या शाळेत एक लहानसा विद्यार्थी इंग्रजीत भाषण देत आहे, ज्यात त्याने महाराजांच्या शौर्याची आणि त्यांच्या विचारांची महती सांगितली आहे. त्याच्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा अभिमान आणि आदर स्पष्टपणे व्यक्त झाला आहे. या विद्यार्थ्याच्या भाषणामुळे जगभरातील लोकांना महाराजांचे विचार आणि कार्याची महत्त्वता समजून घेण्यास मदत होईल.
या उपक्रमात काही मराठी तरुणांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्यांनी युगांडातील शाळेतील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पुस्तके भेट दिली आहेत आणि त्यांना शालेय साहित्याचे वाटप केले आहे. या उपक्रमामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या तरुणांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली जात आहे, कारण त्यांनी आपल्या संस्कृतीचे महत्त्व आणि वारसा जपण्याचा एक अनोखा मार्ग निवडला आहे. युगांडातील त्या विद्यार्थ्याने दिलेल्या भाषणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष हजारो किलोमीटर दूर जाऊन दुमदुमला आहे.





















