Phone Call Timing:सनी देओलचा प्रीती झिंटावर संताप

अभिनेत्री प्रीती झिंटा आता ‘बंटवारा १९४७’ या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. या चित्रपटात ती सनी देओलसोबत पुन्हा एकत्र दिसणार आहे. प्रीतीने तिच
अभिनेत्री प्रीती झिंटा आता ‘बंटवारा १९४७’ या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. या चित्रपटात ती सनी देओलसोबत पुन्हा एकत्र दिसणार आहे. प्रीतीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, हिंदी चित्रपटसृष्टीतील बदल आणि सनी देओलसोबतच्या जुन्या आठवणींवर मनमोकळेपणाने विचार व्यक्त केले. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भैय्याजी सुपरहिट’नंतर प्रीती झिंटा बराच काळ चित्रपटसृष्टीपासून दूर होती. ती म्हणाली, “मी माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि महत्त्वाचे क्षण जगत होते. कुटुंबाबरोबर वेळ घालवत होते आणि मातृत्वाचा आनंद घेत होते. करिअरला मी भरपूर वेळ दिला. त्यानंतर मला माझ्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करायचं होतं.” प्रीतीने पुढे सांगितले की, “आयुष्यातील प्रत्येक टप्पा मनापासून जगला पाहिजे आणि त्याचा आनंद घेतला पाहिजे. भारताबाहेर राहत असताना मला भारताची खूप आठवण यायची, पण अभिनयाची कधीच उणीव भासली नाही. कारण सध्या मी माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि महत्त्वाची भूमिका साकारत आहे, ती म्हणजे आईची भूमिका.”
प्रीती झिंटाने ‘बंटवारा १९४७’ या चित्रपटाची निवड का केली, याबाबत ती म्हणाली, “मला नेहमीच दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा होती. यापूर्वी आम्ही कधीच एकत्र काम केले नव्हते. या चित्रपटाची कथा मला खूप आवडली. आयुष्यातील अत्यंत कठीण परिस्थितीतही आशेचा एक किरण असतो, हा या चित्रपटाचा संदेश आहे. अनेक जण हा भारत-पाकिस्तान फाळणीवर आधारित चित्रपट असल्याचं म्हणतात, पण प्रत्यक्षात ही एका कुटुंबाची कथा आहे. फाळणीच्या भीषण परिस्थितीतून ते कुटुंब कसं जातं, हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.” हिंदी चित्रपटसृष्टीत झालेल्या बदलांबद्दल प्रीतीने बोलताना सांगितले की, “आज भारत स्वतःच्या कथा अभिमानाने सांगत आहे. आपल्या संस्कृती, विविध प्रदेश, खरे नायक, सैन्य आणि देशाशी निगडित अनेक विषयांवर आता चित्रपट तयार होत आहेत. मी करिअरची सुरुवात केली तेव्हा एनआरआय यांच्या आयुष्याभोवती फिरणाऱ्या कथा मोठ्या प्रमाणावर पडद्यावर दिसायच्या.”



















