New Host for KBC: माधुरी दीक्षित 'कोण होणार करोडपती' शोची होस्ट होणार?

‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. याबाबतचा प्रोमो काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला. मात्र, या
‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. याबाबतचा प्रोमो काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला. मात्र, या वर्षीच्या शोचा होस्ट कोण असेल, हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. यापूर्वी या शोचे होस्ट म्हणून स्वप्नील जोशी, नागराज मंजुळे आणि सचिन खेडेकर यांचा समावेश होता. मात्र, यंदा या शोचा होस्ट एक वेगळा चेहरा असणार आहे. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सहभागी झालेल्या सेलिब्रिटींना या होस्टचा चेहरा पाहून आनंद झाला आहे.
फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. या सोहळ्यात अमृता फडणवीस, रेणुका शहाणे, अभिजीत सावंत, वैभव तत्त्ववादी, भरत जाधव, दिलीप प्रभावळकर यांसारख्या अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. या सोहळ्यात ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या होस्टची पहिली झलक पाहुण्यांना दाखवण्यात आली. नव्या होस्टचं नाव समजल्यावर उपस्थित सेलिब्रिटींमध्ये आनंदाची लहर पसरली. विशेषतः रेणुका शहाणे यांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला. अमृता फडणवीस आणि भरत जाधव यांच्या प्रतिक्रियांनी दर्शकांना हे समजले की, ‘कोण होणार करोडपती’ची नवीन होस्ट दुसरी तिसरी कोणी नसून धकधक गर्ल माधुरी दीक्षित आहे.
या प्रोमोच्या कमेंट्समध्ये काही जणांनी महेश मांजरेकर, रितेश देशमुख, प्रसाद ओक यांची नावे घेतली आहेत. पण, अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्समध्ये माधुरी दीक्षितचं नाव घेतलं आहे. याशिवाय, या प्रोमोच्या बॅकग्राऊंडमध्ये धक धक म्युझिक वाजत असल्याने, हे स्पष्ट झाले आहे की माधुरी दीक्षितच या शोची होस्ट होणार आहे. सोनी मराठी वाहिनीने अद्याप नव्या होस्टची अधिकृत घोषणा केलेली नाही. लवकरच याचा अधिकृत प्रोमो प्रदर्शित केला जाईल. आता ‘कोण होणार करोडपती’चा नवीन सीझन केव्हा सुरू होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. माधुरी दीक्षितच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, ती नुकतीच ‘माँ बहन’ या सीरिजमध्ये झळकली आहे, ज्यामध्ये तिच्यासह तृप्ती डिमरी, धरना दुर्गा आणि रवि किशन यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.





















