Gauahar Khan's Viral Photo:गौहर खान पती झैद दरबार व एक्स कुशल टंडनसह एकाच फ्रेम

अलीकडेच प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झालेल्या ‘द अलायन्स’ या शोमध्ये अभिनेत्री मिनी माथूरने विजय मिळवला. शो संपल्यानंतर सर्व स्पर्धकांनी एकत्र येऊन आनंद साजरा केल
अलीकडेच प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झालेल्या ‘द अलायन्स’ या शोमध्ये अभिनेत्री मिनी माथूरने विजय मिळवला. शो संपल्यानंतर सर्व स्पर्धकांनी एकत्र येऊन आनंद साजरा केला. या शोमध्ये वाद, टास्क आणि स्पर्धकांचे भावनिक क्षण याबद्दल सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली. विशेषतः सोहेल खान आणि सीमा सजदेह यांचे नाते तसेच गौहर खानचा पती झैद दरबार आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड कुशल टंडन यांच्यातील चर्चा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. शोमध्ये कुशलने गौहरचा अप्रत्यक्षपणे उल्लेख केला होता, ज्यामुळे तो चर्चेत आला. शो संपल्यानंतर गौहर, झैद आणि कुशल यांचा एकत्रितपणे पार्टी करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
‘अलायन्स’ शो संपल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या रॅप-अप पार्टीत सर्व स्पर्धकांनी भाग घेतला आणि यशस्वी शोच्या आनंदात एकत्र आले. या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. गौहर खानने या पार्टीतील काही क्षण इन्स्टाग्रामवर शेअर केले आणि विजेती मिनी माथूरचे अभिनंदन केले. मात्र, तिच्या शेवटच्या फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे, ज्यामध्ये गौहर, तिचा पती झैद दरबार, मिनी माथूर आणि कुशल टंडन एकत्र दिसत आहेत. गौहरने या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले, “नम्रता, संयम आणि सन्मानाने मिळवलेल्या या विजयासाठी मिनी माथूरचे खूप खूप अभिनंदन! आजची संध्याकाळ खरोखरच खूप खास ठरली.”



















