Advanced Studio to Make Mumbai a Creative Economy Hub:मुंबई सर्जनशील अर्थव्यवस्थेचे जागतिक केंद्र बनेल

मुंबई : भारताला सर्जनशील अर्थव्यवस्थेचे जागतिक केंद्र बनविण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला साकार करण्यासाठी आवश्यक असलेल्या जागतिक दर्जाच
मुंबई : भारताला सर्जनशील अर्थव्यवस्थेचे जागतिक केंद्र बनविण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला साकार करण्यासाठी आवश्यक असलेल्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची निर्मिती सुरू आहे. गोरेगाव येथील फिल्मसिटी परिसरात प्राइम फोकसच्या नव्या अत्याधुनिक स्टुडिओच्या उद्घाटनामुळे मुंबई सर्जनशील उद्योगांचे केंद्र बनण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी या स्टुडिओच्या माध्यमातून मुंबईच्या सर्जनशील उद्योगांना जागतिक स्तरावर एक नवा आकार देण्याची आशा व्यक्त केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी प्राइम फोकसच्या स्टुडिओच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, केंद्रीय माहिती व प्रसारण विभागाचे सचिव चंचल कुमार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, दादासाहेब फाळके चित्रपट नगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे – पाटील आणि प्राइम फोकस समूहाचे अन्य अधिकारी उपस्थित होते. या स्टुडिओच्या माध्यमातून मुंबईत सर्जनशीलता आणि मनोरंजन क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या सुविधांचा विकास होणार आहे.



















