Rare Occasion of Nag Panchami on First Shravan Monday:पहिल्या श्रावण सोमवारी नागपंचमीचा दुर्मिळ योग

परळी : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यातील वाढती गर्दी लक्षात घेऊन वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट आणि स्था
परळी : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यातील वाढती गर्दी लक्षात घेऊन वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट आणि स्थानिक प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. १३ ऑगस्टपासून श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे, तर १७ ऑगस्ट रोजी पहिल्या श्रावण सोमवारी नागपंचमी साजरी केली जाणार आहे. यंदा चौथ्या श्रावण सोमवारी अजा एकादशीसाठी लाखो भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून दर्शन रांगेवर वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येणार आहेत. यामुळे भाविकांना अधिक आरामदायक आणि सुरक्षित दर्शन घेता येईल.
प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात तीन स्वतंत्र दर्शन रांगा तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये महिला व पुरुष भाविकांसाठी वेगवेगळ्या रांगा असतील, तसेच पासधारकांसाठीही एक स्वतंत्र रांग ठेवण्यात येणार आहे. दर्शन रांगेसाठी लोखंडी बॅरिकेड्स उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा आणि नवी दिल्लीसह विविध राज्यांतील भाविक मोठ्या संख्येने परळीत येणार आहेत. यंदा या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे, असे वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांनी सांगितले.



















