ICC ODI World Cup 2027: वेस्ट इंडिजला थेट पात्रता मिळवण्यात अपयश

अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यातील वनडे मालिकेच्या निकालामुळे वेस्ट इंडिजच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. आयर्लंडच्या दौऱ्यावर अफगाणिस्तानने पहिल्या दोन सामन्या
अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यातील वनडे मालिकेच्या निकालामुळे वेस्ट इंडिजच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. आयर्लंडच्या दौऱ्यावर अफगाणिस्तानने पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवून २-० अशी आघाडी घेतली आहे. या विजयामुळे अफगाणिस्तानने २०२७ वनडे वर्ल्ड कपसाठी थेट पात्रता मिळवली आहे. दुसरीकडे, दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजला सलग तिसऱ्यांदा थेट पात्रता मिळवण्यात अपयश आले आहे. त्यामुळे आता त्यांना वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळवण्यासाठी पात्रता फेरी खेळावी लागणार आहे. वेस्ट इंडिजचा संघ १९७५ आणि १९७९ मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकला होता, परंतु आता त्यांना थेट पात्रता मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. २०१९ मध्ये वनडे क्रमवारीत टॉप-८ मध्ये स्थान न मिळाल्यामुळे त्यांना थेट पात्रता मिळाली नव्हती. झिम्बाब्वेमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप क्वालिफायर स्पर्धेतून त्यांनी वर्ल्ड कपमध्ये स्थान निश्चित केले होते, परंतु २०२३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांना ना थेट पात्रता मिळवता आली, ना क्वालिफायरच्या माध्यमातून स्थान मिळवता आले. त्यामुळे आता २०२७ च्या वर्ल्ड कपसाठीही त्यांना पात्रता फेरी खेळावी लागणार आहे.
वेस्ट इंडिजचा संघ सध्या वनडे क्रमवारीत १०व्या स्थानावर आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, यजमान संघ वगळता वनडे क्रमवारीतील आघाडीच्या ८ मध्ये असलेल्या पूर्ण सदस्य देशांना वर्ल्ड कपसाठी थेट पात्रता मिळते. २०२७ चा वनडे वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणार आहे. दक्षिण आफ्रिका टॉप-८ मधील एकमेव यजमान संघ आहे, तर झिम्बाब्वे ११व्या स्थानावर आहे. यामुळे नवव्या स्थानावर असलेल्या बांगलादेशलाही थेट पात्रता मिळवण्याची संधी आहे. मात्र, १०व्या स्थानावरील वेस्ट इंडिजचा थेट पात्रतेचा मार्ग बंद झाला आहे.





















