Sugar Price Surge: साखरेच्या दरात पुन्हा मोठी उसळी; उत्पादन घटल्याने सणासुदीत आणखी महागाईची शक्यता

मुंबई : श्रावण महिना आणि गणेशोत्सवाच्या तयारीच्या काळात साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मुंबईतील घाऊक बाजारात साखरेच्या किमतीत झालेली वाढ आता सर्वसामान्यांच्य
मुंबई : श्रावण महिना आणि गणेशोत्सवाच्या तयारीच्या काळात साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मुंबईतील घाऊक बाजारात साखरेच्या किमतीत झालेली वाढ आता सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करत आहे. सध्या किरकोळ बाजारात साखरेचा दर प्रतिकिलो ५२ ते ५४ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे घरगुती वापरासाठी तसेच मिठाई, बेकरी आणि खाद्यपदार्थांच्या व्यवसायांमध्ये खर्च वाढण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वी घाऊक बाजारात साखरेचा दर ४,४०० रुपये प्रति क्विंटल होता, तर आता तो ४,७०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढला आहे. गेल्या हंगामात साखरेच्या उत्पादनात घट झाल्यामुळे आणि मागणीच्या तुलनेत कमी आवक यामुळे हा दर वाढला आहे. साखर कारखान्यांमध्येही साठा मर्यादित असल्यामुळे पुरवठ्यावर परिणाम होत आहे.
सरकारने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. आवश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत ३० दिवसांपेक्षा जुना साठा जप्त करण्याबरोबरच परवाना रद्द करणे, मोठा दंड आणि तीन ते सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे. भारत हा ब्राझीलनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार देश आहे, तरीही उसाच्या उत्पादनात घट झाल्यामुळे देशांतर्गत साखर उत्पादन मागणीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण राज्यातील किरकोळ बाजारात साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.



















