Serious Warning on UPI Charges: अश्नीर ग्रोवर यांचा सरकारला गंभीर इशारा

देशात यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवर आता मर्चंट डिस्काउंट रेट (mdr) लागू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. संसदेत नुकतेच मंजूर झालेल्या ‘कर आकारणी आणि
देशात यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवर आता मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) लागू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. संसदेत नुकतेच मंजूर झालेल्या ‘कर आकारणी आणि इतर कायदे (दुरुस्ती) विधेयक, २०२६’ मुळे या निर्णयाला अधिकृत मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे देशात एक नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेससह इतर विरोधकांनी यावर तीव्र टीका केली आहे. भारतपेचे सह-संस्थापक अश्नीर ग्रोवर यांनी या संदर्भात सरकारला गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “UPI वर MDR शुल्क लादणे हे एक मागासलेले पाऊल ठरेल. यामुळे देशातील यशस्वी मोबाईल पेमेंट यंत्रणा कोलमडू शकते.” अश्नीर ग्रोवर यांच्या या विधानामुळे या विषयावर चर्चा आणखी तीव्र झाली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर त्यांनी या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ग्रोवर म्हणाले, “भारतात मोबाईल पेमेंट यंत्रणा अत्यंत सुरळीतपणे कार्यरत आहे. UPI वर MDR लादल्यास या यंत्रणेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. हे सरकारचे चुकीचे पाऊल आहे आणि त्यांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा.” त्यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले की, “कोणतेही MDR शुल्क लादल्यास भारतातील एकमेव गोष्ट जी घड्याळाच्या काट्यासारखी कार्यरत आहे, ती म्हणजे मोबाईल पेमेंट यंत्रणा, ती विस्कळीत होईल.” यामुळे या विषयावर चर्चेला आणखी वेग आला आहे.





















