RBI's New Decision: EMI वर घेतलेल्या फोनसाठी नवीन नियम

मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने (rbi) emi वर स्मार्टफोन, टॅबलेट किंवा लॅपटॉप खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाचे नियम जाहीर केले आहेत. या नियमांनुसार, कर्जाची
मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) EMI वर स्मार्टफोन, टॅबलेट किंवा लॅपटॉप खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाचे नियम जाहीर केले आहेत. या नियमांनुसार, कर्जाची थकबाकी भरल्यानंतर संबंधित डिव्हाइस वेळेत अनलॉक न केल्यास बँक किंवा वित्तीय संस्थेला ग्राहकाला प्रति तास २५० रूपये भरपाई द्यावी लागेल. हे नियम १ जानेवारी २०२७ पासून लागू होणार आहेत. यामुळे ग्राहकांना EMI चुकल्यास लगेच फोन लॉक होणार नाही, तर बँकांना काही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. आरबीआयने यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. किमान ३० दिवस कर्ज थकीत राहिल्यानंतरच निर्बंध लागू करण्याची परवानगी असेल. ६० दिवसांनंतरच संपूर्ण डिव्हाइस लॉक करण्याची परवानगी असेल. सुरुवातीला टप्प्याटप्प्याने निर्बंध लावण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. लॉक झाल्यानंतरही काही सुविधा सुरू राहणार आहेत, जसे की इनकमिंग कॉल, SMS, SOS किंवा आपत्कालीन सेवा, नोकरी किंवा कामासाठी आवश्यक असलेली महत्त्वाची फीचर्स, हे फोनवर निर्बंध लावले तरी बंद करता येणार नाहीत. यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात सुविधा मिळणार आहेत, जरी त्यांचे डिव्हाइस लॉक झाले तरी.
या नवीन नियमांमुळे ग्राहकांच्या खासगी माहितीला हात लावता येणार नाही. डिव्हाइस लॉक करण्याच्या प्रक्रियेदरम्यान बँक किंवा वित्तीय संस्था ग्राहकाचे फोटो, व्हिडिओ, संपर्क नंबर, मेसेज, कॉल लॉग, लोकेशन हिस्ट्री यासह कोणत्याही वैयक्तिक डेटामध्ये प्रवेश करू शकणार नाहीत. RBI ने ग्राहकांच्या गोपनीयतेला विशेष महत्त्व दिले आहे. EMI थकल्यास संबंधित डिव्हाइसवर रिमोट निर्बंध लागू होऊ शकतात हे कर्ज मंजूर करतानाच बँकांनी ग्राहकाला स्पष्ट सांगणे बंधनकारक असेल. तसेच निर्बंध लागू करण्यापूर्वी ग्राहकाला पूर्वसूचना देणेही आवश्यक असेल. यामुळे ग्राहकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव होईल आणि त्यांना त्यांच्या कर्जाच्या बाबतीत अधिक पारदर्शकता मिळेल.



















