Big News for SGB Investors: RBI ने प्री-मॅच्युअर रिडेम्प्शन किंमत जाहीर केली

सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने (rbi) sovereign gold bond (sgb) २०२०-२१ series-xi च्या प्री-मॅच्युअर रिडेम्प्शनची कि
सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) Sovereign Gold Bond (SGB) २०२०-२१ Series-XI च्या प्री-मॅच्युअर रिडेम्प्शनची किंमत जाहीर केली आहे. या मालिकेत गुंतवणूक केलेल्या व्यक्तींना ७ ऑगस्ट २०२६ पासून आपल्या गोल्ड बाँड्सचे मुदतीपूर्वक रिडेम्प्शन करण्याची संधी मिळणार आहे. ८ आणि ९ ऑगस्ट या दिवशी सुट्टी असल्यामुळे रिडेम्प्शनची प्रक्रिया ७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. SGB जारी झाल्यानंतर पाच वर्षे पूर्ण झाल्यावर गुंतवणूकदारांना मुदतीपूर्वक रिडेम्प्शनची सुविधा उपलब्ध होते. RBI ने या मालिकेसाठी प्रति युनिट ₹१४,५६४ इतकी रिडेम्प्शन किंमत निश्चित केली आहे, जी ४, ५ आणि ६ ऑगस्ट २०२६ या तीन दिवसांतील ९९९ शुद्धतेच्या सोन्याच्या सरासरी बंद भावावर आधारित आहे. हा दर इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) द्वारे जाहीर केलेल्या सोन्याच्या किमतीवर आधारित आहे.
गुंतवणूकदारांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे, कारण SGB २०२०-२१ Series-XI च्या ऑनलाइन खरेदीसाठी इश्यू किंमत ₹४,८६२ प्रति ग्रॅम होती. आता रिडेम्प्शन किंमत ₹१४,५६४ प्रति युनिट ठरल्यामुळे गुंतवणूकदारांना प्रति युनिट ₹९,७०२ चा नफा झाला आहे. यामुळे गुंतवणूकदारांना सुमारे १९९.५५ टक्के थेट परतावा मिळाला आहे, ज्यामध्ये बाँडवर मिळणारे २.५० टक्के वार्षिक व्याज समाविष्ट नाही. जर एखाद्या गुंतवणूकदाराने ₹१ लाखांची गुंतवणूक केली असेल, तर त्याचे मूल्य आज ₹३ लाखांपर्यंत पोहोचले आहे. याशिवाय, गुंतवणूक कालावधीत २.५० टक्के वार्षिक निश्चित व्याज स्वतंत्रपणे मिळते.



















