Amisha Patel's Take on Marriage: लग्नाबद्दल अमीषा पटेलची भूमिका

मनोरंजन क्षेत्रात अनेक कलाकारांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलचा समावेश आहे. अमीषा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य
मनोरंजन क्षेत्रात अनेक कलाकारांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलचा समावेश आहे. अमीषा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल नेहमीच खुली असते. तिने नुकतीच तिच्या चाहत्यांना सांगितले की, तिला कधीच लग्न करायचे नाही. तिने एक्स वरील #AskAmy च्या माध्यमातून याबाबत स्पष्टता दिली. एका चाहत्याने तिला विचारले, 'तू लग्न कधी करणार?' यावर अमीषाने उत्तर दिले, 'कधीच नाही. सिंगल राहून मी खूप आनंदी आहे. माझ्या आयुष्यात प्रेम करणारे १०० जवळचे मित्र आणि कुटुंबीय आहेत. त्यामुळे एका पुरुषाला माझ्या आयुष्यात येऊ देण्याची माझी इच्छा नाही.' अमीषा पटेलने तिच्या करिअर आणि प्रेमसंबंधांमध्ये केलेल्या कठीण निर्णयांबद्दलही बोलले आहे. तिने स्पष्ट केले की, तिला तिच्या करिअरच्या प्रगतीसाठी काही गोष्टी गमवाव्या लागल्या आहेत. तिने एकदा सांगितले होते की, 'जे लोक तुमच्यावर खरं प्रेम करतात, ते तुमच्या प्रगतीत अडथळा आणत नाहीत.' यामुळे तिला तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळाली. अमीषा म्हणते की, 'मी प्रेमासाठीही खूप काही गमावलं आहे, पण त्या अनुभवातून मी बरेच धडे शिकले.'
अमीषा पटेलने एकदा सांगितले की, 'चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी मी एका रिलेशनशिपमध्ये होते. तो एक मोठ्या उद्योगपती कुटुंबातील मुलगा होता. आमची पार्श्वभूमी आणि शिक्षण सारखे होते, पण जेव्हा मी चित्रपटसृष्टीत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याला ते मान्य नव्हते. त्यामुळे मला करिअरची निवड करावी लागली.' यामुळे तिने प्रेम आणि करिअर यामध्ये एक कठीण निर्णय घेतला. अमीषा पटेलने तिच्या लग्नाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. तिने सांगितले की, योग्य व्यक्ती भेटल्यास तिला लग्न करण्यास हरकत नाही. 'जिथे इच्छा असते, तिथे मार्ग असतो,' असे तिने सांगितले. यामुळे तिच्या चाहत्यांना तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल अधिक माहिती मिळाली आहे.



















