Digital Gold Regulations: डिजिटल सोन्याच्या खरेदीसाठी नवीन नियम येणार का?

डिजिटल सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही मोबाईलद्वारे १० रुपये किंवा १०० रुपयांचे डिजिटल सोने खरेदी करत असाल, तर येणाऱ्या काळात तुमच्या ग
डिजिटल सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही मोबाईलद्वारे १० रुपये किंवा १०० रुपयांचे डिजिटल सोने खरेदी करत असाल, तर येणाऱ्या काळात तुमच्या गुंतवणुकीस अधिक सुरक्षितता मिळू शकते. केंद्र सरकारने पुढील वर्षांत डिजिटल सोन्यासाठी नवीन नियम लागू करण्याचा विचार सुरू केला आहे. या नियमांचा उद्देश म्हणजे मोबाईल ॲपद्वारे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या लाखो लोकांना सुरक्षितता प्रदान करणे आणि फसवणूक करणाऱ्या अविश्वासू प्लॅटफॉर्मवर नियंत्रण ठेवणे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे हित सुरक्षित राहील आणि त्यांना विश्वासार्ह सेवा मिळेल.
डिजिटल प्रेशिअस मेटल्स ॲश्युरन्स कौन्सिल ऑफ इंडियाने (DPMACI) अर्थ मंत्रालय, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयासोबत अनेक महत्त्वाच्या बैठका घेतल्या आहेत. या बैठका डिजिटल गोल्ड व्यवसायासाठी एक मजबूत नियामक चौकट तयार करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आल्या. DPMACI च्या अध्यक्षा निरुपमा सुंदरराजन यांनी स्पष्ट केले की, भारतात डिजिटल गोल्डची लोकप्रियता वाढत आहे आणि त्यामुळे या क्षेत्रासाठी अधिकृत नियम लवकरच लागू होण्याची अपेक्षा आहे. या नियमांमुळे गुंतवणूकदारांचे हित सुरक्षित राहील आणि अविश्वासू ऑपरेटर लोकांना फसवू शकणार नाहीत.

















