24x7 FDA Lab in Aurangabad: छ. संभाजीनगरच्या FDA प्रयोगशाळेचे कामकाज चोवीस तास सुरू होणार

छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या विभागीय प्रयोगशाळेच्या कार्यपद्धतीत महत्त्वपूर्ण बदल होणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रयोगशाळेचे कामकाज
छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या विभागीय प्रयोगशाळेच्या कार्यपद्धतीत महत्त्वपूर्ण बदल होणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रयोगशाळेचे कामकाज भविष्यात चोवीस तास, सातही दिवस सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. या घोषणेमुळे प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मुंढे यांच्या या भूमिकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये दबावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्मचाऱ्यांनी १५ जुलै रोजी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे निवेदन सादर केले होते. या निवेदनात त्यांनी सध्या चालू असलेल्या दोन शिफ्टच्या कार्यपद्धतीला स्थगित करून पूर्वीप्रमाणे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत कामकाज सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. याशिवाय, साप्ताहिक सुटी पूर्ववत ठेवण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. या मागण्या ऐकून आयुक्त मुंढे यांनी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांना स्पष्टपणे नकार दिला आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले की, अन्न व औषध प्रशासनाची प्रयोगशाळा ही एक शासकीय कार्यालय नाही, तर ती चोवीस तास कार्यरत राहणारी संस्था आहे. सध्या संभाजीनगरची प्रयोगशाळा दोन शिफ्टमध्ये सहा दिवस चालू आहे, परंतु आवश्यकतेनुसार ती चोवीस तास सातही दिवस सुरू केली जाऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंढे यांनी कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुटी बंद झाल्याचा गैरसमज करून घेऊ नये, असे सांगितले. सुट्या सुरूच आहेत, मात्र कामकाजात खंड पडू नये म्हणून कर्मचाऱ्यांनी रविवारी किंवा सोमवारी सुटी घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला. यावर त्यांनी कठोर शब्दांत इशाराही दिला की, जर नियमानुसार काम करायचे नसेल तर राजीनामा द्यावा.





















