Kumar Sanu's Shocking Revelation:दुबईत पार्टी, समोर दाऊद बसला होता अन्...

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक कुमार सानू याने अलीकडेच एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. ९० च्या दशकात आपल्या सुरेल आवाजाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या कुमा
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक कुमार सानू याने अलीकडेच एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. ९० च्या दशकात आपल्या सुरेल आवाजाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या कुमार सानूने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या उपस्थितीत एका पार्टीत गाणं गाण्याचा अनुभव सांगितला. संगीतकार अनु मलिक आणि नदीम यांच्यासोबत दुबईतील एका पार्टीत हजेरी लावली होती, जिथे दाऊद इब्राहिमच्या कुटुंबातील एका लहान मुलीचा वाढदिवस साजरा केला जात होता. कुमार सानू म्हणाले की, त्यांना त्या वेळी दाऊद इब्राहिम कोण आहे, याची माहिती नव्हती. त्यांना फक्त एवढे सांगण्यात आले होते की दुबईमध्ये एक वाढदिवसाची पार्टी आहे आणि तिथे गाणं गाण्याची संधी आहे. त्यांनी सांगितले की, 'मी इतर संगीतकारांसोबत तिथे गेलो होतो, त्यामुळे मला त्याच्या ओळखीची कल्पना नव्हती.' पार्टीत गाणं गात असताना दाऊद त्यांच्या समोर बसला होता, हे त्यांना नंतर समजले. या घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांना भीती वाटू लागली, कारण त्यांना कळले की त्यांनी कोणत्या व्यक्तीच्या समोर गाणं गायलं आहे.
कुमार सानूने लल्लनटॉपशी बोलताना सांगितले की, त्या काळात बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड यांच्यातील संबंधाबद्दल अनेक चर्चा होत होत्या. त्यावेळी कलाकारांना अशा पार्टीत बोलावले जात असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यांनी स्पष्ट केले की, 'होय, मला अशा पार्टीत बोलावले गेले होते. थोडीफार सेवा करावी लागली, पण मी त्यासाठी कधीही पैसे घेतले नाहीत.' कुमार सानूच्या या खुलाशामुळे बॉलिवूडच्या अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांची चर्चा पुन्हा एकदा उफाळून आली आहे. त्यांनी सांगितले की, 'दाऊद इब्राहिमच्या समोर गाणं गाणं हे एक धाडसाचे काम होते, पण त्या वेळी मला त्याची ओळख नव्हती.'





















